बीजिंग – चीन देशभक्तीपर शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे. यासाठी चीन सरकारने देशभक्तीपर शिक्षण कायदा संमत केला आहे. या कायद्यामध्ये शाळा-महाविद्यालयांमध्ये देशभक्तीशी संबंधित अभ्यासक्रम शिकवण्याची तरतूद आहे. हा कायदा १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात येणार आहे. जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये चिनी तरुणांमध्ये राष्ट्रीय एकता, देशभक्ती आणि कम्युनिस्ट पक्षाविषयी निष्ठा जागृत करणे, हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे.
१. या कायद्यात म्हटले आहे की, देशातील काही लोक देशभक्ती विसरत चालले आहेत. त्यांना याची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे.
२. ‘ऐतिहासिक शून्यवादा’सारख्या (हिस्टॉरिकल निहिलीजम्) आव्हानांचा सामना करण्यासाठी या कायद्याची आवश्यकता असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. चीनमध्ये जेव्हा लोकांचा कम्युनिस्ट पक्षावरील विश्वास अल्प होऊ लागतो किंवा पक्षाच्या क्षमतेवर शंका घेऊन त्याच्यावर टीका होऊ लागते, तेव्हा त्याला ‘ऐतिहासिक शून्यवाद’ म्हणतात.
संपादकीय भूमिकायावरून चीनमधील अभ्यासक्रमात साम्यवाद्यांचे उदात्तीकरण करणारा अभ्यासक्रम असणार, हे निश्चित ! साम्यवादाविषयी असा खोटा इतिहास शिकून निर्माण झालेली पिढी कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा ! |