परराष्ट्रमंत्र्यांनंतर चीनचे संरक्षणमंत्रीही बेपत्ता !

चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू

बीजिंग (चीन) – चीनचे परराष्ट्रमंत्री बेपत्ता झाल्यानंतर आता संरक्षणमंत्री ली शांगफू हेही बेपत्ता झाले आहेत. यापूर्वी चीनच्या सैन्याच्या ‘रॉकेट फोर्स’चे प्रमुखही बेपत्ता झाले होते. ली शांगफू यांना मार्च २०२३ मध्ये संरक्षणमंत्री बनवण्यात आले होते. जुलै मासामध्ये परराष्ट्रमंत्री किन गांग यांना हटवण्यात आले होते. ते त्यापूर्वी २ मासांपासून बेपत्ता होते.

या संदर्भात जपानमधील अमेरिकेचे राजदूत रेहम इमॅन्युअल यांनी ट्वीट करत म्हटले आहे, ‘गेल्या २ आठवड्यांपासून चीनचे संरक्षणमंत्री दिसलेले नाहीत.’ ली शांगफू २९ ऑगस्ट २०२३ पासून संरक्षणमंत्री दिसलेले नाहीत. ली शांगफू यांनी चीन-आफ्रिका शांताता आणि सुरक्षा परिषदेला संबोधित केले होते. त्यानंतर ते दिसलेले नाहीत.