बीजिंग (चीन) – इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष संपवण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी द्विराष्ट्रीय तत्त्वाचा पुरस्कार केला आहे. इजिप्तच्या पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतर जिनपिंग यांनी या तोडग्याला पाठिंबा दिला.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी पॅलेस्टिनी-इस्रायल संघर्षातून बाहेर पडण्याचा मूळ मार्ग सुचवला आहे. ‘पॅलेस्टाईनच्या सर्वसमावेशक, न्याय्य आणि कायमस्वरूपी तोडग्यासाठी चीन, इजिप्त अन् इतर अरब देश एकत्र काम करतील’, असे जिनपिंग यांनी सांगितले.