इस्रायलला स्वसंरक्षण करण्याचा अधिकार ! – चीन

आतापर्यंत पॅलेस्टाईनचे समर्थन करणार्‍या चीनचे विधान !

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी

बीजिंग (चीन) – आतापर्यंत पॅलेस्टाईनचे समर्थन करणार्‍या चीनने इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचे विधान केले आहे. चीनने हमासच्या अमानुष आक्रमणाचा निषेध केलेला नाही. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली. यानंतर चीनच्या प्रसारमाध्यमांनी वरील वृत्त दिले आहे. वांग यी यांनी म्हटले की, प्रत्येक देशाला स्वसंरक्षण करण्याचा अधिकार आहे; मात्र त्याच वेळी मानवी कायदे आणि नागरिकांचे रक्षण यांसंदर्भातील नियमांचे पालनही केले पाहिजे.