
१. श्री. लक्ष्मण राऊल, पुनोला उकाइझम, बार्देश, गोवा.
अ. ‘एखाद्या आश्रमाला भेट देण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. सनातनच्या या आश्रमाला भेट देणे, हा माझ्यासाठी अत्यंत अद्भूत अनुभव होता.
आ. मी आश्रमात महाप्रसाद ग्रहण केला. तो अतिशय उत्तम आणि पौष्टिक होता.
इ. हे स्थान आरोग्याला पूरक असे असून अत्यंत स्वच्छ आहे.’ (२.३.२०२५)
२. डॉ. मृदुल शुक्ला, लखनौ, उत्तरप्रदेश.
अ. ‘आश्रम पाहून मला अद्भूत वाटले.
आ. सनातन जीवनशैलीचे वैज्ञानिक, तसेच आध्यात्मिक दृष्टीकोनांतून दर्शन घडवणारी जगातील एकमेव संस्था म्हणजे सनातन संस्थाच आहे !’
३. श्री. राकेश गर्ग, जयपूर, राजस्थान.
अ. ‘आश्रमाची कार्यपद्धत अभूतपूर्व आहे.
आ. येथे साधक साधनेच्या माध्यमातून, तसेच हिंदु जीवन पद्धतीनुसार स्वतःला विकसित करत मोक्षाकडे नेणारा मार्ग ‘प्रत्यक्ष जीवनात कसा अवलंबत आहेत ?’, हे पहायला मिळाले.’
४. सौ. सुनीता गर्ग, जयपूर, राजस्थान.
अ. ‘आश्रम पाहून मला पुष्कळ आनंद झाला. संपूर्ण आश्रम अत्यंत स्वच्छ आहे.
आ. येथील व्यवस्थापन अत्यंत उत्तम प्रकारचे आहे.
इ. आश्रमातील महाप्रसाद अमृततुल्य होता.
ई. ‘कर्म आणि उपासना’ या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करता येतात’, ही परात्पर गुरु डॉक्टरांची शिकवण पाहून मी पुष्कळ प्रभावित झाले.’
(३.३.२०२५)