रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर आलेल्या अनुभूती

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. तिरुपतीला बालाजीचे केवळ एकच मिनिट दर्शन झाल्याने मन तृप्त न होणे आणि शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर ‘तिरुपतीचा व्यंकटेश रामनाथी आश्रमातच आहे’, असे वाटणे 

‘एकदा मी तिरुपतीला गेलो होतो. तेथे मला बालाजीचे केवळ एकच मिनिट दर्शन मिळाले. देवदर्शनाने माझी तृप्ती झाली नव्हती. मी बालाजीचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मला एका साधकाचा दूरभाष आला. त्यांना मी तिरुपती येथे असल्याचे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्हाला भू वैकुंठ असलेला रामनाथी (गोवा) येथील ‘सनातन आश्रम’ पहायला जाण्याची संधी आहे.’’ तेव्हा मला ‘गुरुदेवांचे दर्शन होईल’, असे वाटून पुष्कळ आनंद झाला. रामनाथीला आल्यावर ‘शिबिरातील सर्व साधकांवर परात्पर गुरु डॉक्टरांचे चैतन्य पसरले आहे’, असे मला जाणवले. प्रत्यक्ष गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. त्या वेळी ‘तिरुपतीचा व्यंकटेश रामनाथी आश्रमातच आहे’, असे मला वाटले.

श्री. वेंकटेश वासन

२. ‘आश्रमातील प्रत्येक साधक गुरुदेवांचे छोटे रूपच आहे आणि सर्वजण गुरुमय झाले आहेत’, असे वाटणे  

आश्रमातील प्रत्येक साधकाकडे पहातांना ‘साधकांना पहाण्यापेक्षा त्यांच्यातील गुरुदेवांना पहाण्यात पुष्कळ आनंद आहे’, हे माझ्या लक्षात आले. ‘त्यांच्यात काहीतरी एक दैवी शक्ती आहे’, असे मला वाटत होते. ‘कुठली शक्ती ?’, असा विचार करताच ‘आश्रमातील प्रत्येक साधक गुरुदेवांचे छोटे रूपच आहे. सर्वजण गुरुमय झाले आहेत’, असे मला वाटले. तेव्हा ‘मीसुद्धा साधना करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घेतला पाहिजे’, हे लक्षात आले.

३. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यावर थकवा निघून जाऊन उत्साह, चैतन्य आणि सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे 

आश्रमात भगवान कृष्णाचे चित्र आहे. त्याच्याकडे पाहून ‘श्रीकृष्ण प्रत्येक साधकाकडे पहात आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर माझा थकवा निघून गेला आणि त्यातून उत्साह, चैतन्य अन् सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे मला अनुभवता आले.’

– श्री. वेंकटेश वासन, शिवमोग्गा, कर्नाटक

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक