सामुद्रिक शास्त्राच्या दृष्टीने ‘हाताचा अंगठा मागच्या बाजूला वाकणे किंवा न वाकणे’ या संदर्भातील विश्लेषण !

(टीप : सामुद्रिक शास्त्र म्हणजे व्यक्तीचा तोंडवळा, हात, पाय आदी शरिराच्या विविध भागांवरून व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये आणि तिचे भविष्य यांचे वेध घेणारे शास्त्र)

१. काही व्यक्तींच्या हाताचा अंगठा मागच्या बाजूला वाकतो. हे कशाचे दर्शक आहे ?

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला

उत्तर : व्यक्तीच्या हाताचा अंगठा मागे वाकत असल्यास अशी व्यक्ती परिस्थितीशी जुळवून घेते. तिची वृत्ती त्यागी असते, तसेच तिच्यात अहं अल्प असतो; मात्र अंगठा जर पुष्कळ मागे वाकत असेल, तर अन्य लोक संबंधित व्यक्तीचा गैरलाभ घेतात. अशी व्यक्ती निरुत्साही आणि सुस्त असते. तिची इच्छाशक्ती दुर्बल असते, तसेच तिचे मन चंचल असते. तिच्यात आत्मविश्वास अल्प असतो.

२. काही व्यक्तींच्या हाताचा अंगठा मागे न वाकता सरळ रहातो. हे कशाचे दर्शक आहे ?

उत्तर : व्यक्तीच्या हाताचा अंगठा मागे न वाकता सरळ रहात असल्यास अशा व्यक्तीत प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असतो. ती कार्यतत्पर आणि ध्येय साध्य करणारी असते. अशी व्यक्ती धाडसी असून ठरवलेली गोष्ट निश्चित पूर्ण करते; मात्र अशा व्यक्तीची विचारसरणी जर नकारात्मक असेल, तर ती चुकीची कृतीही तितक्याच जोमाने करते. ती दुराग्रही, अविचारी आणि अहंकारी होऊ शकते. त्यामुळे सशक्त आणि मागे न वाकणारा अंगठा असणार्‍या व्यक्तींनी सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.

— हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला, ऋषिकेश. (२२.२.२०२५)