देवद (पनवेल) येथील आश्रमात रहाणारे सनातनचे १०२ वे (समष्टी) संत पू. शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे) यांनी ‘कवितेच्या माध्यमातून साधकांना साधना कशी करावी ?’ याविषयी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

साधनेचे ध्येय असे ठेवा की, सतत प्रेरणेने बळ येईल ।
प्रार्थना अशी करा की, देवच पूर्ण करून घेईल ।। १ ।।
चुका अशा स्वीकारा की, त्यातून शिकता येईल ।
साधक असे बना की, साधकत्व नतमस्तक होईल ।। २ ।।
प्रीती अशी करा की, जग जिंकता येईल ।
स्वतःला असे पालटा की, जगात पालट होईल ।। ३ ।।
कृती अशी करा की, ती परिपूर्णच होईल ।भाव अ
सा ठेवा की, देवच सेवा करून घेईल ।। ४ ।।
साधना अशी करा की, सत्वर गुरुकृपा होईल ।
शिष्य असे व्हा की, गुरुकृपेचा ओघ सतत राहील ।। ५ ।।
प्रगती अशी करा की, जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटका होईल ।
हृदयी गुरुचरण (टीप) असे धरा की, याच जन्मी मोक्षप्राप्ती होईल ।। ६ ।।
टीप – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.