भाजपचे ज्येष्ठ नेते जय भगवान गोयल यांची देहली सरकारकडे मागणी

नवी देहली – आता वेळ आली आहे की, रस्ते, गावे, शहरे यांना असणारी मुसलमान आक्रमकांची नावे पालटण्यात यावी, हीच छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या हौतात्म्यदिनी खरी श्रद्धांजली असेल, असे विधान संयुक्त हिंदू मोर्चाचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जय भगवान गोयल यांनी येथे केले. ते छत्रपती संभाजी महाराजांच्या ३३६ व्या हौतात्म्य दिनानिमित्त ईशान्य देहलीतील बाबरपूर विधानसभा मतदारसंघातील बाबरपूर बस टर्मिनल येथे ‘युनायटेड हिंदु फ्रंट दिल्ली’ संघटनेकडून आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी गोयल यांनी औरंगजेबाचे थडगे छत्रपती संभाजीनगरातून कायमचे काढून टाकावे आणि देहलीतील बाबरपूर बस टर्मिनलला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी केली.
संपादकीय भूमिकादेहलीत आता भाजपचेच सरकार आल्याने अशी मागणी कुणाला करावी लागू नये, तर सरकारने स्वतःहून मुसलमान आक्रमकांच्या खुणा नष्ट कराव्यात ! |