‘व्यक्तीची प्राणशक्ती उत्तम असल्यास ती व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवन उत्तम प्रकारे व्यतीत करू शकते; मात्र तिची प्राणशक्ती न्यून झाल्यास तिच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात. ‘व्यक्तीची प्राणशक्ती न्यून का होते ? यावर उपाय काय ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

१. शारीरिक
‘व्यक्तीच्या श्वसनसंस्थेमध्ये काही बिघाड असल्यास तिला आवश्यक असलेला प्राणवायू पुरेशा प्रमाणात मिळत नाही. अशा व्यक्तीची स्थिती पाणी न मिळालेल्या वृक्षाप्रमाणे होते. तेव्हा शरिराचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी त्या व्यक्तीची अतिरिक्त प्राणशक्ती व्यय होते. त्यामुळे व्यक्तीची प्राणशक्ती न्यून होते.
१ अ. उपाय : वैद्यांना विचारून प्रतिदिन ठराविक वेळ प्राणायाम करावा.
२. मानसिक
अतीविचार किंवा अतीदुःख यांमुळे व्यक्तीची प्राणशक्ती न्यून होते.
२ अ. उपाय : स्वभावदोष-निर्मूलन होण्यासाठी प्रतिदिन नियमित स्वयंसूचना देणे आवश्यक आहे.
३. आध्यात्मिक
अनिष्ट शक्तींची सूक्ष्मातील आक्रमणे
३ अ. उपाय : संतांनी सांगितल्याप्रमाणे नियमित नामजपादी उपाय करावेत.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१.२०२५)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |