साधना केल्यास मागील जन्मांतील विवाहाशी संबंधित देवाण-घेवाण हिशोब विवाह न करताही फिटू शकतो !

‘१६ आणि १७ डिसेंबर २०२४ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘पती-पत्नी मधील देवाण-घेवाण हिशोब’, यासंदर्भातील आध्यात्मिक विश्लेषण !’, याविषयी ईश्वराच्या कृपेने मला सूक्ष्मातून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा लेख प्रसिद्ध झाला होता. तो वाचल्यावर एका साधिकेने मला विचारलेला प्रश्न आणि त्याचे देवाच्या कृपेने मला सूक्ष्मातून मिळालेले उत्तर पुढे दिले आहे. 

श्री. राम होनप

प्रश्न : साधक किंवा साधिका यांनी विवाह न करता साधना केल्यास त्यांचा मागील जन्मांतील विवाहाशी संबंधित देवाण-घेवाण हिशोब कसा पूर्ण होतो ?

उत्तर : ‘साधक किंवा साधिका यांची साधना आणि त्यांच्यावरील गुरुकृपा’, यांमुळे त्यांचा मागील जन्मांतील विवाहाशी संबंधित देवाण-घेवाण हिशोब विवाह न करता फिटू शकतो.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’,  याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक