
आजपर्यंत हिंदूंचा एकही सण किंवा उत्सव निर्विघ्नपणे पार पडला, असे होत नाही. त्यावर धर्मांध मुसलमानांची वक्रदृष्टी असतेच ! यंदाही त्याचा अनुभव हिंदूंनी घेतला. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात महाशिवरात्रीनिमित्त जमलेल्या हिंदूंवर धर्मांधांनी गोळीबार केला. यात ३ हिंदू घायाळ झाले. यानंतर हिंदू तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले, तर नेहमीप्रमाणे पोलिसांनी तक्रार प्रविष्ट करून घेण्यास नकार दिला. हिंदूंच्या तक्रारीच्या संदर्भात ही पोलिसांची कार्यपद्धतच झाली आहे. हिंदूंना लाथाडायचे आणि मुसलमानांना कुरवाळायचे. तक्रारीसाठी सरससरळ नकार देणारे पोलीस हवेतच कशाला ? पोलिसांची ही मोगलाई वेळीच रोखायला हवी ! ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ।’ (सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांवर नियंत्रण) असे ब्रीदवाक्य तोंडदेखले मिरवायचे, हेच त्यांना ठाऊक आहे. हिंदूंच्याच देशात हिंदूंचीच मुस्कटदाबी करण्याचा अधिकार या पोलिसांना दिला कुणी ? गोळीबाराची घटना काही साधीसुधी नव्हे; खरेतर पोलिसांनीच धर्मांधांना सज्जड दम द्यायला हवा होता; पण झाले उलटेच ! ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल. अशांना बडतर्फच करायला हवे. हे झाले हिमाचल प्रदेशामध्ये ! झारखंड राज्याचा यात दुसरा क्रमांक लागला. तेथे महाशिवरात्रीनिमित्त पताका आणि ध्वनीक्षेपक लावण्यासाठी गेलेल्या हिंदूंवर धर्मांधांनी दगडफेक केली. ते केवळ इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी एक चारचाकी आणि २ दुचाकी पेटवून हिंदूंशी वाद घातला. यात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हिंदूंचा सण हिंदूंनी साजरा नाही करायचा, तर मग कुणी करायचा ? हजारीबाग (झारखंड) येथेही धर्मांध मुसलमानांनी महाशिवरात्रीसाठी ध्वज लावणार्या हिंदूंवर आक्रमण केल्याचे वृत्त उघड झाले आहे. त्यांनी म्हटल्यावर भगवा ध्वज खाली उतरवायला हा काय पाकिस्तान आहे का ?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भगवा डौलाने फडकत असे. त्याला खाली उतरवण्याचे किंवा ‘तो लावू नका’, असे सांगण्याचे कुणाचे धाडसही झाले नाही, ना कधी कुणाच्या मनात तसा विचार आला असेल ! छत्रपती शिवरायांच्या साम्राज्यात भगव्याला मान मिळत होता; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज अनेक सरकारे मुसलमानांची बटीक झाली असल्याने आणि हिंदूंमधील धर्माभिमान नष्ट झालेला असल्याने फडकता ध्वज ही संकल्पनाच काही प्रमाणात पुसट होऊ लागली आहे. ‘हिंदवी स्वराज्या’चे उदात्त ध्येय बाळगलेल्या आणि मोगल आक्रमकांना पुरून उरलेल्या छत्रपती शिवरायांच्या देशाला हे निश्चित्तच लाजिरवाणे ठरत आहे. भगवा पुन्हा एकदा मानाने आणि डौलाने फडकला पाहिजे, ते केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे. उत्तरप्रदेशाच्या बरेली जिल्ह्यातील हाजियापूर परिसरात आगामी होळीचे नियोजन करणार्या हिंदूंवरही धर्मांधांनी आक्रमण केले, तसेच होळी साजरी केल्यास जिवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. ‘होळी साजरी केल्यास मृतदेहांचा ढिग रचू’, अशा शब्दांत ही धमकी देण्यात आली. हे चाललयं तरी काय ? या देशात रहायचे मुसलमानांनी ! कुणी काय करायचे आणि काय नाही करायचे ? यावरही हक्क त्यांचाच ! मग हिंदूंनी काय त्यांचे गुलाम व्हायचे का ? थोडक्यात काय, तर ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी हिंदूंची गत झाली आहे, नव्हे हिंदूंनी ती करून घेतली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या ३ राज्यांमधील प्रातिनिधीक घटना आहेत. अन्य राज्यांमध्येही असे प्रकार अल्प-अधिक प्रमाणात घडलेले असू शकतात; पण आणखी किती काळ धर्मांधांच्या धमक्यांना भिऊन हिंदू घरात थांबणार आहेत ? त्यांना सामोरे जाण्याचे धाडस हिंदूंमध्ये कधी निर्माण होणार ? याचा हिंदूंनीही विचार करायला हवा. वर्ष २०२५ चालू झाले. महाशिवरात्र आणि होळी यांना विरोध झाला. आता १ मासाच्या अंतराने गुढीपाडवा येईल. वर्षभरात असंख्य सण-उत्सवांची मांदियाळीच आहे. धर्मांधांच्या अशा किती आक्रमणांना सामोरे जावे लागणार आहे ? सण-उत्सव साजरे करणारे हिंदू कट्टर धर्मांधांच्या निशाण्यातून सुरक्षित रहातील का ? हा प्रश्नच आहे. हिंदूंनीच याचा गांभीर्याने विचार करावा. हिमाचल प्रदेश, झारखंड येथील सध्याची सरकारे पहाता हिंदूंना तेथे आशादायी दिवस दिसणे कठीणच आहे; कारण तेथील सरकार उघडपणे धर्मांधांचे लांगूलचालन करते. बांगलादेशी घुसखोरांना आश्रय पुरवते. मुसलमानप्रेम ऊतू जाणार्या अशा राज्यांमध्ये हिंदूंचा टिकाव लागणे अशक्य आहे; पण उत्तरप्रदेश येथील हिंदुत्वनिष्ठ योगी सरकारने तरी हिंदूबहुल भारतातील हिंदूंना न्याय देण्यासाठी कृतीशील पावले उचलावीत !
पायघड्या कुणासाठी ?
हिंदूंच्या सण-उत्सवांना असलेली वादाची किंवा आक्रमणाची किनार हटवण्यासाठी सरकार प्रयत्न करत नाही; पण अन्य धर्मियांचे सण-उत्सव अगदी धूमधडाक्यात, मोठ्या उत्साहात कसे पार पडतील, यासाठी काही राज्यातील सरकारे पायघड्याच घालतात. तमिळनाडू येथील सरकारचे उदाहरण अगदी ताजे आहे. रमझानच्या काळात मुसलमानांना मशिदींमध्ये उपवासाची पेज दिली जाते. पेजेसाठीच्या तांदुळाची पूर्तता द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाच्या सरकारकडून होणार आहे. तमिळनाडू सरकार प्रतिवर्षी मशिदींना तांदूळ देणार आहे. तांदूळ पुरवण्याची मागणी मुसलमान प्रतिवर्षी करतात आणि आतापर्यंत सरकार ती मागणी पुरवत आले आहे. मशिदींना सवलतींची खैरात आणि मंदिरे मात्र सरकारच्या नियंत्रणात ! हा अन्याय नव्हे का ? हिंदूंनी कितीही वैध मार्गांनी प्रयत्न केले, तरी त्यांना लगेच यश मिळत नाही. उलट धर्मांधांचा हिंदूबहुल भारतातील अवैध मार्ग त्यांना त्यांचे ईप्सित साध्य करून देतो, हे खेदजनक आहे. ‘मुसलमानांनी शब्द टाकावा आणि सरकारने तो झेलावा’, असे सध्या भारतात चालू आहे. यात भरडला जातो तो केवळ हिंदू ! खेदाची गोष्ट म्हणजे ना त्या हिंदूंच्या टाहोकडे कुणाचे लक्ष आहे, ना कुणी लक्षात येऊनही त्याला वाचवत आहे. हिंदू त्यांच्याच देशात पोरके झाले आहेत.
हिंदूंसाठी धोक्याची घंटा !
मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात हिंदु मुलींना हिजाब घालायला सांगून त्यांचे छायाचित्र काढले जाते आणि धर्माभिमान नसलेल्या या मुलीही ‘हिजाब घातल्यावर चांगले आणि आरामदायी वाटले’, असे कोणतीही लाज न बाळगता सांगत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला. हिंदु धर्माने दिलेली जीवनशैली न अंगीकारता अन्य धर्माचे समर्थन करणारी पिढी निर्माण होणे, ही भारतातील हिंदूंसाठी धोक्याची घंटाच आहे. कोणे एकेकाळी काही हिंदू सुपात होते; पण आता भारतातील सर्वच हिंदू जात्यात आहेत, हे वास्तव नाकारून चालणार नाही. ही स्थिती पालटण्यासाठी धर्मशिक्षण घेणे, धर्माभिमान जोपासणे आणि धर्मपालन करणे हाच एकमात्र उपाय आहे. हिंदूंनी तो उपयोगात आणून जात्यात जाणार्या हिंदूंना वाचवावे आणि सुपातील हिंदूंना बाहेर काढून खर्या अर्थाने सर्वांना सुरक्षितता देणारे हिंदु राष्ट्र स्थापावे !
पोलिसांनी हिंदूंची तक्रार घेण्यास नकार देत धर्मांधांची पाठराखण करणे हा ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचाच प्रकार होय ! |