Bareilly Threat On Holi Celebration : ‘जर होळी साजरी केली, तर आम्ही मृतदेहांचा खच पाडू !’

बरेली (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांची हिंदूंना मारहाण करत धमकी

बरेली (उत्तरप्रदेश) – बरेली जिल्ह्यातील हाजियापूर येथे होळी साजरी करण्याचे नियोजन करणार्‍या हिंदूंवर धर्मांध मुसलमान तरुणांनी आक्रमण केल्याने तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ६ मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. हिंदूंनी  आरोप केला आहे की, ‘जर होळी साजरी केली, तर मृतदेहांचा खच पाडू’, अशी धमकी धर्मांध मुसलमानांनी आम्हाला दिली होती. हाजियापूर, जोगी नवादा आणि चकमहमूद हे भाग संवेदनशील क्षेत्रे आहेत. (क्षेत्रांच्या नावावरूनच येथे कुणाचे संख्याबळ आहे, हे लक्षात येते. त्यामुळे येथे कुणाचे प्राबल्य आहे आणि ही संवेदनशील क्षेत्रे का आहेत, हेही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही ! – संपादक) याआधीही श्रावण महिन्यात येथे वाद झाला होता. तेव्हा कावड यात्रेकरूंवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आली होती.

१. हाजियापूर येथील रहिवासी लक्ष्मण, मुन्ना, शनी आणि आकाश हे त्यांच्या परिसरात होळीच्या कार्यक्रमावर चर्चा करत होते. त्याच वेळी परिसरातील अयान, सलमान, अमन, रेहान, भुरा आणि आलम यांच्यासह इतर अनेक मुसलमान तरुण तिथे पोचले अन् त्यांनी अचानक त्यांच्यावर आक्रमण केले. तसेच त्यांना ठार मारण्याची धमकीही दिली. झालेल्या मारहाणीत लक्ष्मण, मुन्ना आणि आकाश घायाळ झाले. लक्ष्मण आणि त्याच्या साथीदारांचे म्हणणे आहे की, मुसलमानांना होळीपूर्वी परिसरातील वातावरण जाणूनबुजून बिघडवायचे आहे.

२. घटनेनंतर बारादरी पोलिसांनी घटनास्थळी पोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. हे प्रकरण हिंदु-मुसलमान यांच्याशी संबंधित असल्याने पोलीस सतर्क आहेत. त्यामुळे परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अन्य आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

संपादकीय भूमिका 

उत्तरप्रदेशात भाजपचे योगी आदित्यनाथ यांचे कठोर कारवाई करणारे सरकार असतांनाही धर्मांधांवर वचक बसलेला नाही, हे यातून लक्षात येते ! अशा हिंसाचार्‍यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने कायदा करून त्याची त्वरित कार्यवाही होण्यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !