
१. वर्षानुसार सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. निषाद देशमुख यांच्या ज्ञान मिळवण्याच्या क्षमतेचे प्रमाण
२. ज्ञान मिळवण्याची क्षमता न्यून होण्याची कारणे
२ अ. आध्यात्मिक त्रासात घट झाल्याने अनावश्यक ज्ञानाचे प्रमाण न्यून होणे : पूर्वी आध्यात्मिक त्रासामुळे मला मिळणारे ज्ञान पुष्कळ क्लिष्ट, अत्यधिक विश्लेषणात्मक आणि अनावश्यक असायचे, उदा. रांगोळीच्या संदर्भात कुणालाही कळणार नाही, असे ज्ञान. त्या तुलनेत आता मिळणार्या ज्ञानाची भाषा सरळ आणि सोपी झाली असून ज्ञानाचे स्वरूप संक्षिप्त झाले आहे. थोडक्यात, पूर्वी ‘वाईट शक्ती समष्टीचा वेळ घालवण्यासाठी देत असलेल्या अनावश्यक ज्ञानात घट झाली असून त्यामुळे एकूण ज्ञान मिळण्याचे प्रमाण उणावले आहे’, असे मला जाणवते.
२ आ. जिज्ञासा आणि तळमळ यांत घट होणे : पूर्वी ‘मी सर्व विषयांवर लिखाण करायला हवे’, असा तीव्र हट्टाचा विचार माझ्या मनात असायचा. त्यामुळे अन्य साधक किंवा संत यांचे एखाद्या विषयावरील ज्ञान प्रसिद्ध झाल्यावर माझ्याकडून ‘त्यांनी कोणते सूत्र लिहिले नाही ? किंवा त्यात आणखी कोणते पैलू सांगायचे राहिले आहेत ?’, यांचा जिज्ञासेने शोध घेण्याचा भाग व्हायचा. आता तसे वाटण्याचे प्रमाण उणावले असून ‘प्रश्नात दिलेल्या सूत्रानुसार सोपे ज्ञान घ्यावे’, असा विचार माझ्या मनात असतो. त्यामुळे पूर्वी ज्ञानाच्या संदर्भात जाणवणारी जिज्ञासा आणि तळमळ आता जाणवत नसल्याने लिखाणाचे प्रमाण न्यून झाले आहे.
२ इ. अंतर्मुखता न्यून झाल्याने पूर्वीच्या तुलनेत ज्ञान मिळवण्यातील आनंदात घट होणे : पूर्वी ज्ञानाची सेवा करतांना ‘अध्यात्मातील कोणते नवीन पैलू शिकायला मिळणार ? ज्ञानाचे टंकलेखन करतांना सूक्ष्मातून चांगले किंवा त्रासदायक काय जाणवते किंवा काय अनुभूती येते ?’, यांकडे लक्ष देणे, त्या संदर्भात प्रश्न विचारणे, त्याचे काय उत्तर येणार ? पडताळणीसाठी दिलेल्या ज्ञानात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले कोणते प्रश्न विचारणार ?’, याची मला उत्सुकता असायची आणि त्यामुळे ज्ञान मिळवण्यातील सेवेतून आनंद मिळायचा. या आनंदाचे प्रमाण पुष्कळ असल्याने त्रास सोसूनही ज्ञानाची सेवा करण्याची माझी सिद्धता असायची. सध्या तशी अंतर्मुखता न्यून झाल्याने ज्ञान मिळवण्यातील सेवेतून मला आनंद मिळण्याचे प्रमाणही उणावले आहे.
२ ई. इतर सेवांना वेळ देण्याचा भाग वाढल्यामुळे ज्ञानाच्या सेवेला अल्प महत्त्व देणे : मागील काही वर्षांत आश्रम स्तरावरील साधकांची संख्या अल्प झाल्यामुळे ‘आश्रमात आलेल्या पाहुण्यांना आश्रम दाखवणे, शब्दकोशाच्या सेवेच्या संदर्भातील समन्वय, ‘सनातन पंचांगा’साठी विज्ञापनांची सेवा’, अशा अनेक सेवांमधील माझा सहभाग वाढला आहे. या सेवांना वेळेची मर्यादा असल्यामुळे त्यांना अधिक वेळ द्यावा लागतो. त्यामुळे त्या तुलनेत ज्ञानाच्या सेवेला अल्प वेळ दिला जातो.
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०२५)
सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |