धर्माचरणाची आवड असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील कु. अगस्त्य कस्तुरे (वय १५ वर्षे) !  

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. अगस्त्य कस्तुरे हा या पिढीतील एक आहे !  

(‘वर्ष २०२५ मध्ये कु. अगस्त्य कस्तुरे याची आध्यात्मिक पातळी ५५ टक्के आहे.’ – संकलक)

चि. अगस्त्य कस्तुरे यांस १५ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक आशीर्वाद !

चि. अगस्त्य कस्तुरे

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ऐकण्याची वृत्ती

‘कु. अगस्त्यच्या आईने ‘एखादी गोष्ट वाईट आहे, ती करू नये’, असे सांगितल्यावर तो लगेच ऐकतो. त्याच्यामध्ये आज्ञापालन हा गुण वाढू लागला आहे.

२. साहाय्य करणे

अगस्त्यची आई कार्यालयात जाते. तेव्हा तो घरातील सगळे व्यवस्थितपणे सांभाळतो. तो बहिणीलाही कामे करण्यासाठी साहाय्य करतो. तो स्वतःची कामे स्वतःच करतो.

३. समंजस

तो कधीही कपडे, खाऊ इत्यादींसाठी हट्ट करत नाही. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजोबांनी त्याला ‘टॅब’ (लहान संगणक) देऊ का ?’, असे विचारले होते. तेव्हा तो म्हणाला, ‘‘माझे अभ्यासातील लक्ष न्यून होईल; म्हणून मला तो नको.’’

४. सहनशीलता

त्याला डिसेंबर २०२३ मध्ये टायफॉईड (विषमज्वर) झाला होता. त्याला रुग्णालयात भरती केल्यावर त्याने सर्व उपचार शांतपणे करून घेतले.

५. धर्माचरणाची आवड

अ. मागील वर्षी त्याचा व्रतबंध सोहळा झाला. त्या वेळी त्याने सगळे धार्मिक विधी आवडीने आणि भावपूर्ण केले.

आ. तो अंघोळ केल्यावर देवाला नमस्कार, जेवणापूर्वी प्रार्थना आणि जेवण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करतो. तो उपायांचा नामजप आणि भावजागृतीसाठीचे प्रयोग करतो. तो माझ्या घरी आल्यावर माझ्यासमवेत अग्निहोत्र करतो.

इ. तो एका संस्कारवर्गाला आवडीने जातो. तेथे तो स्तोत्र, श्लोक आणि नैतिक मूल्यांच्या गोष्टींतील स्पर्धेत आवडीने भाग घेतो, तसेच पारितोषिकही मिळवतो.

‘गुरुदेवा, आपल्या कृपेनेच अगस्त्यचे गुण माझ्या लक्षात आले. त्याच्यावर तुम्हाला अपेक्षित असे संस्कार तुम्हीच करवून घ्या’, अशी मी शरणागत भावाने प्रार्थना करते.’

– सौ. मुक्ता देशपांडे (अगस्त्यची आजी, आईची आई), कोलशेत, ठाणे. (४.८.२०२४)

______________________________________________________

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.