Waqf Property : स्मारकांच्या ठिकाणी पुरातत्व विभागाचा कायदा मोडून करण्यात आले आहेत अनेक पालट !

वक्फच्या संपत्तीत देशातील २८० वारसा स्मारके अंतर्भूत

नवी देहली – संयुक्त संसदीय समिती वक्फ सुधारणा विधेयकावरील अहवाल संसदेला सादर केल्यानंतर तो १३ फेब्रुवारी या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. त्यानंतर यावर गदारोळ झाला. या अहवालामध्ये देशातील महत्त्वाची अनुमाने २८० वारसा स्मारके वक्फ बोर्डाची मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यात कुतुबमिनार, फिरोजशाह कोटला, पुराण किल्ला, हुमायूनचा मकबरा (थडगे), जहांआरा बेगमचा मकबरा, कुतुबमिनार परिसरातील लोखंडी स्तंभ आणि इल्तुतमिशचा मकबरा यांसारख्या स्मारकांवरही वक्फचा दावा आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने याची सूची समितीला सादर केली होती.

पुरातत्व विभागाने समितीला सांगितले की, वक्फ बोर्डाने आम्हाला स्मारकांचे जतन करण्याची अनुमती दिलेली नाही. स्वतःच्या इच्छेनुसार तिथे पालट केले. पुरातत्व कायदा मोडला गेला. गोपनीयतेच्या नावाखाली, स्मारकांमध्ये प्रवेश थांबवण्यात आला. तिथे छायाचित्रण, स्मृतीचिन्हे आदी विकण्याची अनुमती देण्यात आली. मूळ रचना पालटून बांधकाम केले. दुकाने बांधली गेली आणि ती भाड्याने दिली गेली.

संपादकीय भूमिका

  • पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणार्‍या स्मारकांमध्ये कोणताही पालट करता येत नसतांना तो करणे हा गुन्हा आहे. वक्फ बोर्डाच्या संबंधितांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !
  • हिंदूंच्या प्राचीन मंदिरांना कह्यात ठेवून हिंदूंना पूजा करण्यापासून रोखणारा पुरातत्व विभाग मुसलमानांसमोर मात्र शेपूट घालतो, हे लक्षात घ्या !