‘७.४.२०२२ या दिवशी दुपारी १ वाजता श्री. प्रदीप चिटणीस (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६० वर्षे) यांनी शुद्ध गंधार (ग) या एकल स्वराचे गायन केले. त्या वेळी मी रेखाटलेले चित्र आणि त्याविषयीची माहिती येथे दिली आहे.

१. स्वरांविषयी संक्षिप्त माहिती

स्वर म्हणजे एका ठराविक स्थिर कंपनसंख्येचा ध्वनी. भारतीय संगीतात षड्ज (सा), ऋषभ (रे), गांधार (ग), मध्यम (म), पंचम (प), धैवत (ध) आणि निषाद (नी) असे सात मूळ स्वर (सप्तक) मानले गेले आहेत. भारतीय संगीतात सप्त स्वरांचा संबंध निसर्गातील ध्वनींशी जोडला आहे. जसे षड्ज – मोराचा आवाज, ऋषभ – चातक पक्ष्याचा आपल्या जोडीदाराला साद घालण्याचा आवाज, गांधार – शेळीच्या ओरडण्याचा आवाज, मध्यम – करकोच्याचा आवाज, पंचम – कोकिळेची कुऽ हुऽ कुऽ हुऽ, धैवत – घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज, निषाद – हत्तीचे ओरडणे.
(संदर्भ : https://vishwakosh.marathi.gov.in)
२. श्री. प्रदीप चिटणीस शुद्ध गांधार (ग) एकल स्वर गात असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

(शुद्ध स्वर : जेव्हा स्वर आपल्या मूळ जागेवरच असतात, तेव्हा त्यांना ‘शुद्ध स्वर’ असे म्हणतात.)
अ. श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘ग’ हा स्वर आळवायला आरंभ केल्यावर माझे मन एकाग्र झाले.
आ. थोड्या वेळाने ‘ग’ या स्वराचा नाद ऐकल्यावर माझ्या मणिपूरचक्रावर उष्ण स्पंदने जाणवली.
इ. मला आरंभी शक्तीची स्पंदने ३० टक्के जाणवली.
ई. श्री. प्रदीप चिटणीस यांनी द्रुत (जलद) लयीमध्ये गायन चालू केल्यावर त्यातील ‘शक्तीची स्पंदने माझ्या मणिपूरचक्रावरून एकदम सहस्राराच्या दिशेने वेगाने वर गेली आहेत’, असे मला जाणवले.
२ उ. सूक्ष्मातून ‘गांधार’ या स्वराशी संबंधित देवतेचे दर्शन होणे : एका पाठोपाठ ‘ ग, ग, ग,’ या स्वराचे गायन होत असतांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘एक पुरुष आकाशी निळे धोतर, गुलाबी रंगाचा शेला; गळ्यात, हातांत आणि कानांत खड्यांचे अलंकार’ या वेशात उभा आहे आणि त्या व्यक्तीच्या सभोवती पांढरा प्रकाश आहे.’ ‘ती व्यक्ती ‘गांधार’ या स्वराची देवता आहे’, असे मला वाटले.
२ ए. श्री. प्रदीप चिटणीस ‘ग’ हा स्वर आळवत असतांना साधिकेने त्या स्वराशी संबंधित चित्र रेखाटणे आणि त्या चित्राकडे पाहून तिला जाणवलेली सूत्रे

२ ए १. डोळ्यांसमोर ‘ग’ या स्वराचे रूप दिसणे आणि ‘तो स्वर हवेत तरंगत आहे, त्याच्या मागे पांढरा प्रकाश आहे’, असे दिसणे अन् त्या स्वराचे चित्र रेखाटणे : चिटणीसकाका ज्याप्रमाणे स्वर आळवत होते, त्याप्रमाणे त्यांचा नाद पुष्कळ मधुर जाणवत होता. काही वेळाने माझ्या डोळ्यांसमोर ‘ग’ या स्वराचे रूप आले आणि ‘तो स्वर हवेत तरंगत आहे. त्याच्या मागे पांढरा प्रकाश आहे’, असे मला दिसले. त्या वेळी मला त्या स्वराचे चित्र काढावेसे वाटले.
२ ए २. ‘या चित्राकडे पाहून काय जाणवते ?’, याचा अभ्यास करणे
अ. ‘मी ‘ग’ या स्वराकडे संमोहित होत (hypnotized झाल्यासारखे) आहे’, असे मला जाणवले.
आ. त्या स्वराला पाहून माझ्या अनाहतचक्रावर हलक्या संवेदना जाणवल्या.
इ. माझे ४ – ५ मिनिटे ध्यान लागले.
ई. मला दिसले, ‘त्या स्वराचा रंग फिकट निळा आहे आणि त्याच्या सभोवती पांढरा रंग आहे.’
उ. मी चित्र पहातांना माझ्या मनात ‘हा स्वर सरस्वती लोकातील आहे’, असा विचार आला. (१२.८.२०२४ सायंकाळी ७:१० ते ७ :१९)
३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना चित्र दाखवल्यावर ते म्हणाले, ‘‘चित्र पाहून ‘ग’ हा स्वर दिसला आहे’, हे लक्षात येत आहे. त्याचा अर्थही लागत आहे.’’
– कु. म्रिणालिनी देवघरे (भरतनाट्यम् विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१३.८.२०२४)
|