परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात आलेल्‍या अनुभूती 

‘एकदा मला प्रथमच लाभलेल्‍या परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात ते मला सूर्याच्‍या पांढर्‍या तेजाप्रमाणे तेजस्‍वी दिसत होते. त्‍यानंतर मला त्‍यांचा सत्‍संग लाभला. त्‍या वेळी ते मला पूर्णतः गुलाबी रंगाचे दिसत होते.

सौ. स्वाती पालव

२. ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या खोलीतील श्रीकृष्‍णाचे चित्र आणि प.पू. भक्‍तराज महाराज अन् त्‍यांचे शिष्‍य परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र’ यांकडे पाहून जाणवलेली सूत्रे

अ. श्रीकृष्‍णाच्‍या चित्राकडे पहातांना ‘तो माझ्‍याशी बोलत आहे. त्‍याच्‍या हातातील सुदर्शनचक्र गरगर फिरत आहे’, असे मला जाणवले. मला श्रीकृष्‍णाचा शेला पुष्‍कळ फिकट रंगाचा दिसला. मला त्‍या चित्रात चैतन्‍य जाणवले.

आ. मला प.पू. भक्‍तराज महाराज यांचे छायाचित्र सजीव भासले. मला छायाचित्रात निर्गुण तत्त्व आणि चैतन्‍य जाणवले.

इ. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे डोळे बोलके आणि तेजस्‍वी दिसत होते. मला त्‍यांच्‍या छायाचित्रात पुष्‍कळ चैतन्‍य जाणवले.

‘हे गुरुदेवा, तुम्‍ही मला या अनुभूती दिल्‍याबद्दल तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. स्‍वाती साबाजी पालव, बोईसर, महाराष्‍ट्र.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक