
पुणे – आपली मातृभाषा मराठी असून आपल्या मराठी भाषेविषयी जर कुणी अटकाव करत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आपल्याला प्रत्येक भाषेचा आदर आहे. आपण कधीही त्यांच्या भाषेचा अनादर करत नाही; पण महाराष्ट्रामध्ये येऊन मराठी भाषा बोलू नये, हळदी-कुंकू कार्यक्रम घेऊ नये, अशा प्रकारची कुणी बळजोरी करत असेल, तर सध्याच्या कायद्यापेक्षा कडक कायदा झाला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मराठी भाषा बोलली गेली पाहिजे, अशी भूमिका उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मांडली. ते फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये ‘विश्व मराठी संमेलन २०२५’चा आढावा घेत होते.
मागील अनेक दिवसांपासून मराठी आणि अमराठी व्यक्तींमध्ये वाद होण्याच्या घटना घडल्या आहेत. या संमेलनामध्ये त्यावर चर्चा होणार का ? येत्या काळात काही निर्णय घेणार आहात का ? त्यावर ते बोलत होते.