परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची स्वीकृती
मुंबई – लाडक्या बहिणींना बसमध्ये ५० टक्के सवलत आणि ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य बस सवलत यांमुळे एस्.टी. तोट्यात गेली आहे. अशी सवलत सर्वांना देत बसलो, तर एस्.टी. महामंडळ चालवणे कठीण होईल. महिला आणि ज्येष्ठ यांना देण्यात येणार्या सवलतींमुळे एस्.टी.ला प्रतिदिन ३ कोटी रुपयांचा तोटा होत आहे, अशी स्वीकृती परिवहनमंत्री प्रताप सरदेसाई यांनी दिली आहे. धाराशिव येथे ‘व्हाईस ऑफ मिडिया’ या पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना सवलती घोषित केल्यामुळे एस्.टी.ला आर्थिक लाभ होत असल्याची प्रसिद्धीपत्रके एस्.टी. महामंडळाकडून प्रसिद्ध करण्यात येत होती; मात्र या योजनांमुळे तोटा होत असल्याच्या परिवहनमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे याविषयी वस्तूस्थिती लपवून ठेवली जात आहे का ? असा प्रश्न पुढे येत आहे. परिवहनमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे एस्.टी.च्या सवलती बंद करण्यात येणार का ? अशी चर्चा होत आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची स्वीकृती सवलती चालूच रहातील ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री![]() एस्.टी.च्या तिकिटामध्ये सवलत देण्यासाठी लाडक्या बहिणी आणि ज्येष्ठ यांना आम्ही वचन दिले आहे. त्यामुळे या सवलती चालूच रहातील, असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. |