मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई – येत्या ११ फेब्रुवारीपासून इयत्ता १२ वीची आणि २१ फेब्रुवारीपासून इयत्ता दहावीची परीक्षा चालू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ‘बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको’, अशी मागणी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
त्यांनी पत्रात म्हटले आहे की,…
१. इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षेस परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा देण्यास अनुमती, तसेच परीक्षेच्या वेळी आवश्यकता वाटल्यास पडताळणीसाठी महिला पोलीस अधिकारी किंवा शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी, असे शासनस्तरावरून कळवण्यात आले आहे.
२. जर परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला, तर एखादी परीक्षार्थी बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा उपयोग करून परीक्षा देत आहे किंवा नाही, हे पडताळणे शक्य होत नाही. आकस्मिक प्रसंगी काही आक्षेप उद्भवल्यास सामाजिक, तसेच कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना हानी सहन करावी लागेल.
३. परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत.
संपादकीय भूमिकाशिक्षण विभागाने या मागणीची तातडीने कार्यवाही करावी, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे ! |