UK Grooming Gangs Scandal : पाकिस्तानी मुसलमानांच्या ‘ग्रुमिंग गँग’ने माझ्यावर १००० हून अधिक वेळा केला बलात्कार : पीडित ब्रिटीश मुलीने कथन केल्या वेदना !

(टीप : ‘ग्रूमिंग गँग’ म्हणजे लहान मुली किंवा तरुणी यांनी जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणारी टोळी !)

प्रतिकात्मक छायाचित्र

लंडन – एका ब्रिटीश मुलीवर पाकिस्तानी पुरुषांच्या एका ‘ग्रूमिंग टोळी’ने १००० हून अधिक वेळा बलात्कार केला. तिला ‘गोरी मेम’ (गोरी बाई) असे संबोधून तिचा छळ करण्यात आला. एका ब्रिटीश वृत्तवाहिनीने पीडित मुलीच्या वेदना कथन केल्या आहेत.

१. पीडित मुलगी महाविद्यालयामध्ये शिकत असतांना तिला अँड्रिया नावाची एक मुलगी भेटली. तिने तिची ओळख एका पाकिस्तानी मुसलमान पुरुषाशी करून दिली. तो पाकिस्तानी एका कबाबच्या (मांसाहारी पदार्थाच्या) दुकानात काम करायचा. ती नियमितपणे कबाबच्या दुकानात जाऊ लागली. तो तिला विनामूल्य कबाब खायला द्यायचा आणि प्यायला दारूही द्यायचा. याखेरीज तो विनामूल्य सिगारेटही देत असे.

२. त्यानंतर अँड्रियाने तिला दुसर्‍या ठिकाणी नेले, जिथे तिला काही पाकिस्तानी कबाब विक्रेते आढळले. तेथे ५-६ कबाब विक्रेत्या मुसलमानांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्या ‘ग्रूमिंग टोळी’ने तिला वेगवेगळ्या शहरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

३. त्या टोळीने धमकावत तिच्यावर बलात्कार करणे चालू ठेवले. ते तिला ‘कुत्री’ वगैरे म्हणत शिवीगाळ करायचे. तिच्या मागे चाकू घेऊन गुंड पाठवले जायचे.

४. ही घटना ब्रिटनच्या टेलफोर्ड शहरात घडली. वर्ष २०२२ मध्ये टेलफोर्ड शहरातील एका ‘ग्रूमिंग गँग’च्या चौकशीनंतर सर्वांनाच धक्का बसला. या चौकशी अहवालात असे उघड झाले आहे की, येथे वर्षानुवर्षे १ सहस्रांहून अधिक मुलींचे लैंगिक शोषण झाले होते.

५. ब्रिटनमधील हे लैंगिक शोषण वर्ष १९८० च्या दशकापासून चालू होते आणि पाकिस्तानी ‘ग्रूमिंग टोळ्या’ सतत या मुलींना लक्ष्य करत असत.

६. ब्रिटनमध्ये पाकिस्तानी मुसलमानांकडून ब्रिटीश मुलींना ग्रूमिंग करण्याचे प्रकार सातत्याने चालू आहेत. इलॉन मस्क यांनीही याविषयी कारवाईची मागणी केली आहे. तथापि कीअर  स्टार्मर यांच्या सरकारने ‘ग्रूमिंग’ प्रकरणांची चौकशी करण्यास नकार दिला आहे आणि संसदेत हा प्रस्तावही फेटाळून लावला आहे. (असे करणे, हे कथित धर्मनिरपेक्षतेचे सोंग पांघरलेल्या ब्रिटनचा आत्मघात करण्यासारखेच होईल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

जिहाद्यांची क्रूर आणि विकृत मानसिकता !