सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केल्याचे वृत्त वाचून ‘गोवा येथे ईश्वरी राज्य स्थापन होण्यास आरंभ झाला आहे’, असे वाटणे

‘६.१.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘म्हापसा (गोवा) येथील श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !’ हे वृत्त वाचले. तेव्हा मला काही प्रश्न पडले आणि त्यावर पूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेले आठवले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काही वर्षांपूर्वी ‘गोव्यामध्ये ईश्वरी राज्य आले की, त्याचे पडसाद संपूर्ण जगात उमटतील’, असे सांगणे

सनातनच्या प्रसाराचे केंद्र गोवा येथे का ठेवले आहे ? प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘गोवा येथे सनातनचे मुख्य कार्यालय (विश्वदीप) होईल’, असे सांगितले होते. त्याचे कारण काय ?, असे प्रश्न मला पडले, त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले काही वर्षांपूर्वी सांगितलेले आठवले.

परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले होते, ‘‘गोवा राज्य संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. आपण जे ईश्वरी राज्याचे ध्येय ठेवले आहे, त्या ईश्वरी राज्याचा आरंभ गोव्यापासून होणार आहे. गोव्यामध्ये ईश्वरी राज्य स्थापन झाले की, त्याचे पडसाद संपूर्ण जगात उमटतील. ‘रेझोनन्स इफेक्ट’ (अनुनादाचा प्रभाव) प्रमाणे गोव्यामध्ये ईश्वरी राज्य स्थापन झाले की, त्याच्या परिणामस्वरूप भारतातील अन्य राज्यांत आणि नंतर जगातील अन्य देशांतही ईश्वरी राज्य येईल.’’

पू. रमेश गडकरी

२. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्त वाचून ‘सनातनच्या कार्याला हळूहळू हिंदुत्वनिष्ठ राज्य सरकारकडून पोचपावती मिळू लागली आहे. गोव्यात ईश्वरी राज्य स्थापन होण्यास आरंभ झाला आहे’, असे मला वाटले.

३. ‘स्वराज्य म्हणजे सात्त्विक राज्य ! गोव्यासारख्या आकाराने लहान राज्यात ईश्वरी राज्य स्थापन करणे सोपे होईल आणि एक ‘प्रोटो टाईप’ (आद्य, ज्याच्यापासून अन्य विकसित होतात) राज्याची लोकांना कल्पनाही येईल’, असे मला वाटले.’

– पू. रमेश गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.१.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक