हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना ईश्वरेच्छेने होणारच आहे, त्यासाठी पुनर्जन्माची आस ठेवू नका !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘हिंदूंनो, ‘हिंदु राष्ट्र’ हे ईश्वर संकल्पित आहे आणि त्याच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे, ही आपली काळानुसार साधना आहे. त्यासंदर्भात हेही लक्षात घेतले पाहिजे की, योग्य काळ आल्यावर त्याची स्थापना होणारच आहे. त्यामुळे ‘या जन्मात ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना झाली नाही, तर त्यासाठी मी पुन्हा जन्म घेईन’, असा विचार कोणी करत असल्यास, तो विचार मानसिक स्तरावरचा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. ईश्वरावर श्रद्धा ठेवून साधना करत जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊन हा जन्म सार्थकी लावणे, केव्हाही श्रेष्ठ ठरते आणि ते ईश्वराला आवडेल !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१८.१.२०२४)