नामस्मरणाने ‘जिव्हा’ जिंकली जाते !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

श्रीमहाराज (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज) एकदा म्हणाले, ‘ज्याने जीभ जिंकली, त्याने अर्धा परमार्थ साधला.’ ‘या म्हणण्याचा अर्थ काय ?’, असे एका साधकाने विचारले. तेव्हा श्रीमहाराजांनी उत्तर दिले, ‘जिभेची कामे दोन, म्हणजे खाणे आणि बोलणे. बोलण्यावर ताबा येण्यासाठी नामाचा अभ्यास करावा. सपाटून नाम घ्यावे. कोटी, दोन कोटी नामाची संख्या झाली की, खाण्याची वासना आपोआप न्यून होते. शरिराला थोडे अन्न पुरते. थोडे खाण्याने तृप्ती येते. पुढे पुढे तर बोलण्याची उर्मी आतूनच लटकी पडते. कुणी अनुभव घेऊन पहातच नाही त्याला काय करावे ?’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)