१. ‘जग’ आणि ‘जग’ या शब्दांत केवळ उच्चाराचा भेद आहे. जग जिंकणे म्हणजे काय ?
अलेक्झांडरने जग जिंकले, म्हणजे केवळ दगड-मातीवर सत्ता प्रस्थापित केली; पण ज्याने जीवनकला आत्मसात् केली, जीवनशक्तीवर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि जो जगण्यातील आनंद मिळवू शकतो, त्यानेच खरे जग जिंकले.
२. आत्मज्ञानाचे आगर म्हणजे अक्कलकोट होय.
३. देहबुद्धीतून, देहबुद्धीच्या कचाट्यातून सुटका करून घेऊन ज्याने इंद्रियांवर सत्ता प्रस्थापित केली, तोच खरा स्वामी !
४. परमेश्वराच्या निकट वास्तव्य म्हणजे ‘उपवास’ होय. त्याच्याजवळ जाणे, त्याला अधिक जाणण्याचा प्रयत्न करणे, म्हणजे ‘उपवास’ !
– प्रा. गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे, कोल्हापूर (‘गुरुबोध’)