‘९.२.२०२२ या दिवशी माझे बाबा (पू. नीलेश सिंगबाळ (आताचे सद्गुरु नीलेश सिंगबाळ)) पहाटे वाराणसी येथे जाण्यासाठी निघाले. त्या आधी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील पालट पहायला आई-बाबा यांच्या समवेत (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. नीलेश सिंगबाळ) मलाही जाण्याची संधी मिळाली. त्या वेळी त्यांनी त्यांच्या खोलीतील प्रयोग करवून घेतले. तसेच त्यांची खोली आणि त्यांचा देह यांत झालेले पालट दाखवले. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि आई (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) यांचा वार्तालाप चालू असतांना परात्पर गुरु डॉक्टर पूर्वीपेक्षा पुष्कळ प्रकाशमान दिसणे आणि त्यांच्याकडून येणारी ऊर्जा आईच्या माध्यमातून समष्टीला मिळत असल्याचे जाणवणे
परात्पर गुरु डॉक्टर यांच्या खोलीतील पालट पाहून झाल्यावर ते आईशी समष्टी सेवेविषयी बोलत होते. त्यांचा वार्तालाप चालू असतांना मला परात्पर गुरु डॉक्टर पूर्वीपेक्षा पुष्कळ प्रकाशमान दिसत होते. मी त्यांच्याकडे पाहिल्यावर माझे डोळे दिपल्यासारखे झाले. ‘त्या वेळी जसे तळपत्या सूर्याकडे बघणे कठीण जाते’, तसे त्यांच्याकडे बघणे मला कठीण वाटत होते; म्हणून मी आईकडेच बघत होतो. त्या वेळी माझ्या मनात ‘शुभ्र प्रकाशाचे तेजस्वी किरण परात्पर गुरु डॉक्टरांकडून आईकडे जात आहेत आणि आईकडून ती ऊर्जा सर्व समष्टीला मिळत आहे’, असा विचार आला.
२. ‘वार्तालाप चालू असतांना देवघराकडून वातानुकूलन यंत्राप्रमाणे शीतल लहरी येत आहेत’, असे जाणवणे
वरील वार्तालाप चालू असतांना मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीतील देवघराकडे पाठमोरा बसलो होतो. तेव्हा ‘देवघराकडून माझ्याकडे वातानुकूलन यंत्राप्रमाणे शीतल लहरी येत आहेत’, असे मला जाणवले.’
– श्री. श्रीहरि सिंगबाळ (वय २६ वर्षे) (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |