मॉस्को – रशियात आश्रय घेतलेले सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. ५९ वर्षीय असद गंभीर आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. चाचणीनंतर त्यांच्या शरिरात विष असल्याची पुष्टी झाली. रशियन अधिकारी विषप्रयोगात सहभागी असलेल्या गुन्हेगाराचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. असद यांना कुणी विष दिले, हे अद्याप समोर आलेले नाही. सीरियात गेल्या महिन्यात झालेल्या सत्तापालटानंतर बशर अल असद यांना रशियाने राजकीय आश्रय दिला आहे.