M F Husain : हिंदुद्वेष्टे एम्.एफ्. हुसेन यांनी रेखाटलेली हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे प्रदर्शित करणार्‍या ‘देहली आर्ट गॅलरी’च्या विरोधात तक्रार !

उजवीकडे अधिवक्त्या अमिता सचदेवा

नवी देहली – ‘हुसेन द टाइमलेस मॉडर्निस्ट’ या शीर्षकाखाली देहलीत आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात दिवंगत हिंदुद्वेष्टे चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांनी रेखाटलेली हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे प्रदर्शित केल्याविषयी ‘देहली आर्ट गॅलरी’ आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक आशिष आनंद यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. देहली उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी ही तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. हिंदुद्वेष्टे चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे रेखाटून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत आणि कायद्याचे उल्लंघनही केले आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे.

१. या प्रदर्शनात मांडीवर बसलेल्या नग्न महिलेसह भगवान श्रीगणेशाचे चित्र, हातात नग्न स्त्रीला पकडून भगवान हनुमान उड्डाण करत असलेले चित्र, तसेच महिलांची इतर अनेक नग्न चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत.

२. एम्.एफ्. हुसेन यांनी रेखाटलेल्या यांच्यावर यापूर्वीच भारतात अनेक गुन्हे नोंदवण्यात आले होते. तथापि कायद्याला सामोरे जाण्याऐवजी ते कतारला पळून गेले होते. जून २०११मध्ये त्यांचे निधन झाले.

३. या प्रदर्शनामुळे असंख्य हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान झाला आहे. हुसेन यांनी रेखाटलेली हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे प्रदर्शित करणार्‍या ‘देहली आर्ट गॅलरी’ आणि त्याचे व्यवस्थापकीय संचालक आशिष आनंद यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी पोलिसांकडे केली आहे.

संपादकीय भूमिका

हुसेन हयात असेपर्यंत जगभरातील हिंदूंनी त्यांच्या विरोधात वैध मार्गाने लढा दिला. कोट्यवधी हिंदूंच्या धर्मभावनांची जाणीव ‘देहली आर्ट गॅलरी’ला नाही का ? अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !