पू. अश्विनीताई यांना,
नमस्कार !
आज मला तुमच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत आहे. तुम्ही आमच्यासाठी किती करत आहात ! आमच्या साधनेची घडी बसावी; म्हणून तुम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहात. तुम्ही आजारी असतांनाही खोलीत बसून सेवा करत असता; पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, मला ‘तुम्ही माझ्यासाठी किती करत आहात आणि तुम्ही साक्षात् महालक्ष्मीस्वरूप श्री सत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे एक रूप आहात’, याचीही जाणीव नाही. तुम्ही मला प्रयत्न करायला सांगत असता; पण मी ऐकत नाही. साक्षात् श्रीमन्नारायण स्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने मला तुमचा सहवास लाभला आहे. ते प्रत्येक वेळी सांगत असत, ‘‘अश्विनीचा लाभ करून घे. तिचे साहाय्य घेऊन पुढे जा’’; पण मी तुमचा लाभ करून घेत नाही. पू. ताई, मला क्षमा करा. मी आता नकारात्मक बोलणार नाही. मी आता प्रयत्न करणार. पू. ताई, तुम्हीही मला साहाय्य करा हं !
– सुश्री (कु.) नीलिमा कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.१०.२०२३)