पू. (सौ.) अश्विनीताई म्हणजे संतपुष्पहारातील अद्वितीय फूल !

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

पू. (सौ.) ताई म्हणजे संतपुष्पहारातील अद्वितीय फूल ।
साधक घडवण्या आणिले गुरूंनी हे सुगंधी फूल ।।
गुरुकार्य (समष्टी) करण्या आले महर्लाेकातूनी हे समष्टी फूल ।
दरवळणारा सुगंध सांगे ‘ईश्वरप्राप्ती हेच आपल्या जन्माचे ध्येय मूळ’ ।। १ ।।

सुश्री (कु.) लीना कुलकर्णी

संतरूपातील या फुलाचा रंग असे पिवळा ।
ज्ञानरूपी सत्संगाचा नित्य वाहे हा चैतन्यमयी झरा ।।
या झर्‍याचा ओघ जावो थेट आमच्या अंतरी ।
अंतर्बाह्य शुद्धी होवो आमची, हीच प्रार्थना आजच्या दिनी ।। २ ।।

संतरूपातील या फुलाचा रंग होई कधी गुलाबी ।
प्रीतीची उधळण करण्या जणू आले प्रत्येकावरी ।।
तुमच्या प्रीतीच्या विविध रंगांच्या छटांतूनी ।
उमजू देत आम्हाला आमचे दोष आणि अहं, हीच प्रार्थना आजच्या दिनी ।। ३ ।।

संतरूपातील या फुलाचा रंग कधी होई पांढरा ।
पारदर्शकता आणि निर्मळता यांचा प्रकाश जणू पसरलेला ।।
राहूनी सतत हसतमुख घडविले आम्हा साधकांना निशिदिनी ।
राहू दे याची जाणीव मनी, हीच प्रार्थना आजच्या दिनी ।। ४ ।।

– सुश्री (कु.) लीना कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक