Khalistani Terrorist Arshdeep Dalla Arrest :कॅनडामध्ये खलिस्तानी आतंकवादी अर्शदीप डल्ला याला अटक

खलिस्तानी आतंकवादी अर्शदीप डल्ला

ओटावा (कॅनडा) – कॅनडाच्या पोलिसांनी खलिस्तानी आतंकवादी अर्शदीप डल्ला याला १० नोव्हेंबरला अटक केली. २८ ऑक्टोबर या दिवशी कॅनडामध्ये झालेल्या गोळीबारानंतर अर्शदीप याला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याची सुटका झाली कि नाही ?, हे अद्याप समजू शकलेले नाही.

अर्शदीप खलिस्तानी आतंकवादी निज्जर याचा सहकारी आहे. निज्जर याची कॅनडामध्येच हत्या करण्यात आली आहे. वर्ष २०२२ मध्ये ‘खलिस्तान टायगर फोर्स’ या खलिस्तानी संघटनेचा आतंकवादी म्हणून अर्शदीप सिंग गिल उपाख्य अर्शदीप डल्ला याला केंद्रीय गृह मंत्रालयाने आतंकवादी घोषित केले होते. पंजाबमधील मोगा येथून त्याने कॅनडामध्ये पलायन केले होते. हत्यांसह अनेक गुन्हेगारी कृत्ये आणि आतंकवादी कारवया यांमध्येही त्याचा सहभाग आहे.