५४ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली वर्धा येथील चि. माधवी हितेश निखार (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. माधवी निखार ही या पिढीतील एक आहे !


‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

_______________________________________
पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

चि. माधवी निखार

१. श्रीमती सरिता रा. निखार (आजी)

१ अ. जन्मापूर्वी

१. ‘माधवीच्‍या जन्‍माच्‍या वेळी ‘मुलगा झाला, तर मी केशव, माधव, हरि असे नाव ठेवीन’, असे मला वाटत होते; पण मुलगी झाली. तरीही मी शांत होते.’

१ आ. जन्म ते २ मास

अ.  बाळाच्‍या अंगावर १२ व्‍या दिवसापासूनच दैवी कण दिसत होते.

२. सौ. स्वाती येळणे, पुलगाव (माधवीची लहान आत्या)

२ अ. सातवा मास

१. ‘बजरंग बली हनुमान की जय’ आणि इतर जयघोष केल्यावर माधवी प्रतिसाद देत असे. तसेच श्लोक म्‍हटल्यावरही ती हसून आनंद व्‍यक्त करायची.

२ आ. आठवा मास

१. ‘तिला ‘श्रीकृष्‍णाला बोलव’, असे म्‍हटले की, ती पाळण्यातील बाळकृष्‍णाच्‍या चित्राकडे पाहून हसायची.’

२ इ. नववा मास

१. ‘माधवीला ‘आरती करू’, असे म्‍हटल्यावर ती देवघरात येऊन टाळ्‍या वाजवायची. नमस्‍कार करायला सांगितल्यावर नमस्कार करायची.’

२ ई. वय – १ ते २ वर्षे

१. सात्त्विकतेची आवड : ‘तिला देवपूजा करायला आवडते. ती देवाला अंघोळ घालते. ती देवाच्‍या चित्राला टिळा लावून फुले वहाते. ती देवाला जेवायला बोलावते. तिला ‘ज्‍योतसे ज्‍योत जगाओ’ ही  सद्गुरूंची आरती आवडते, तसेच ती आरती म्‍हणण्‍याचा प्रयत्न करते.’

३. कु. अर्चना निखार (मोठी आत्‍या)

अ. ‘माधवी तिच्‍या बाबांना ‘केशवा माधवा’ हे तिचे आवडते भक्तीगीत म्‍हणायला लावते. हे गीत ऐकल्यावर ती लगेच झोपते.

आ. ‘माधवीला तुळशीचे पान खायला पुष्‍कळ आवडते. देवघरातील तुळशीची पाने ती स्‍वतः खाते.’

इ. ती आनंदी असते आणि खेळत असते.’

४. स्वभावदोष : हट्टीपणा.

(सर्व सूत्रांचा दिनांक : डिसेंबर २०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे ‘फॉर्म्युले’ सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.