छत्रपती संभाजीनगर – येथील उद्धव ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वेळी पोलिसांना हस्तक्षेप करून अखेर लाठीमारही करावा लागला. यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आमदार आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या उपाहारगृहाबाहेर हा सर्व प्रकार घडला. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार घडला.