सोलापूर येथे हिंदूंसाठी आधारभूत कार्य करण्याचा ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’चा निर्धार !

बैठकीला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

सोलापूर, ६ ऑगस्ट (वार्ता.) – २४ ते ३० जून या कालावधीत फोंडा, गोवा येथे झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवासाठी गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांची ४ ऑगस्ट या दिवशी बैठक घेण्यात आली. या बैठकीत हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून वर्षभर हिंदूंसाठी आधारभूत कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे सोलापूर जिल्हा समन्वयक श्री. राजन बुणगे आणि कु. वर्षा जेवळे यांनी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली.

या वेळी कु. वर्षा जेवळे म्हणाल्या, ‘‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती ही हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रबोधनात्मक कार्य करील. यासमवेतच हिंदु समाजाला सक्षम करणे, संविधानिक मार्गाने मार्गक्रमण करण्यासाठी प्रवृत्त करणे, समाजामध्ये प्रतिभावंत आणि नेतृत्व करणार्‍या व्यक्तींची एक फळी उभी करणे या उद्देशाने समितीची स्थापना करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या आघातांच्या माध्यमातून हिंदूंवर प्रतिदिन आक्रमणे होत आहेत. या सर्वांवर एकच उपाय आहे. तो म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ त्यासाठी प्रत्येकाने कर्तव्य भावनेने कार्य केले पाहिजे. नेतृत्व घेऊन कार्य करणार्‍यांचा समन्वय करण्याचे आधारभूत कार्य ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’ करेल.’’

या वेळी सोलापूर येथील ‘पूर्वभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’चे अध्यक्ष श्री. संजय साळुंके, भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक श्री. बापू ढगे, ‘अक्कलकोट प्रज्ञापिठ’चे अध्यक्ष श्री. प्रसाद पंडित, अधिवक्ता मुकुंद कुलकर्णी, अधिवक्त्या (सौ.) अर्चना बोगम, अधिवक्ता रमेश पाटील, अधिवक्ता शिवाजी होटकर, अधिवक्ता वारद, जनहित संघटनेचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री. अजय (भैय्या) साळुंके, श्री. प्रशांत सोंजी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ, श्री. दत्तात्रय पिसे आणि सौ. राजश्री देशमुख आदी उपस्थित होते.