Grant For Madrasa Students : संस्कृतच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार, मग मदरशांतील मुलांना का नाही ? – खासदार रमाशंकर राजभर, समाजवादी पक्ष

खासदार रमाशंकर राजभर

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश सरकारने संस्कृत शाळा आणि उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाच्या शाळा यांमधील गुणवंत मुलांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे, मग मदरशांतील गुणवंत मुलांना पुरस्कार का दिला जात नाही ?, असा प्रश्‍न उत्तरप्रदेशमधील सलेमपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रमाशंकर राजभर यांनी राज्य सरकारला विचारला.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकभवन येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, टॅबलेट आणि एक लाख रुपये देऊन त्यांचा गौरव केला. यासह त्यांनी पालकांच्या खात्यात १ सहस्र २०० रुपयेही जमा केले.

यावर खासदार राजभर यांनी वरील प्रश्‍न उपस्थित केला. ‘मदरशांतील विद्यार्थ्यांचा सन्मान करू नये, हाच भाजपचा ‘सबका साथ – सबका’ विकास आहे का ?’, असा प्रश्‍नही राजभर यांनी उपस्थित केला.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांच्या लांगूलचालनाची एकही संधी न सोडणारा समाजवादी पक्ष !
  • सरकारकडून मदरशांना दिल्या जाणार्‍या अनुदानाविषयी ‘मदरशांना अनुदान, मग वेदपाठशाळांना का नाही ?’, असा प्रश्‍न कधी राजभर यांनी विचारला आहे का ? यावरून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो !