गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।

(अर्थ : गुरुकृपा शिष्याचे परम कल्याण करते.)

गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी गुरुपौर्णिमा २१ जुलै २०२४ या दिवशी आहे. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. अशा गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे.

गुरुपौर्णिमा या दिवशी गुरु तत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटींनी कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग (सत्साठी अर्पण) यांचा  इतर दिवसांच्या तुलनेत १ सहस्र पटींनी लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरुकृपेची (ईश्वर कृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे.

प्रत्येक गुरूंचे शिष्य या दिवशी त्यांच्या गुरूंची पाद्यपूजा करतात आणि त्यांना गुरुदक्षिणा मनोभावे अर्पण करतात.

गुरुपूजनाची अधिक माहिती जाणून घ्या !

https://www.sanatan.org/mr/a/974.html