Islamic State Genocide Hindus : हिंदूंचा नरसंहार करा !

इस्लामिक स्टेटच्या ‘व्हॉईस ऑफ खुरासान’ मासिकातून भारतासह जगभरातील मुसलमानांना आवाहन

नवी देहली – इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ‘व्हॉइस ऑफ खुरासान’ (खुरासान म्हणजे उत्तर पूर्वी इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उजबेकिस्तान या देशांचा भूप्रदेश.) या मासिकाच्या ताज्या अंकात भारतातील, तसेच जगभरातील मुसलमानांना हिंदूंच्या नरसंहारासाठी आवाहन करण्यात आले आहे. महमूद गझनी आणि महंमद बिन कासिम यांसारख्या मुसलमान आक्रमणकर्त्यांचे कौतुक करतांना मासिकाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् भाजपच्या इतर नेत्यांना ‘इस्लामचे शत्रू’ घोषित केले आहे.

काय म्हटले आहे मासिकात ?

हिंदूंची मंदिरे, घरे आणि मालमत्ता यांना आग लावा !

मासिकाच्या मुखपृष्ठावर लिहिले आहे, ‘हे बहुदेववादी भारतीय राजा ! महमूद गझनीचा सामना करण्यासाठी पुन्हा सज्ज हो !’ पुढे मुसलमानांना उद्देशून म्हटले आहे, ‘भारतातील मूर्तीपूजकांना मारून टाका. त्यांचे पोट चाकूने कापून टाका. त्यांची मंदिरे, घरे, गाड्या, मालमत्ता आणि पिके यांना आग लावा. गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करा. त्यांना दाखवा की, प्रेषित महंमद यांचे अनुयायी अजूनही जिवंत आहेत.’

जगभरातील मुसलमानांनी एकत्र येऊन भारतावर आक्रमण करावे !

जर भारतातील मुसलमान हिंदूंवर आक्रमण करू शकत नसतील, तर जगभरातील मुसलमानांनी एकत्र येऊन भारतावर आक्रमण केले पाहिजे. एवढे करूनही जर तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नसाल, तर इस्लामचे दरवाजे तुम्हाला धर्मातून बाहेर जाण्यासाठी उघडे आहेत.

जिहादसाठी एकत्र न येणार्‍या मुसलमानांवरही टीका !

या लेखात मुसलमानांना चिथावणी देण्यासाठी ‘मुसलमानेतर मुसलमानांच्या भूमीवर नियंत्रण मिळवून शरीयत कायद्याची खिल्ली उडवत महिलांचा अपमान करत आहेत’, असे सांगण्यात आले आहे. तसेच ‘आजचे बहुतेक मुसलमान या जगाच्या प्रेमात पडले आहेत; म्हणून ते जिहादच्या मार्गात मरण्याचे धैर्य एकवटण्यास असमर्थ आहेत’, अशी टीकाही मुसलमानांवर करण्यात आली आहे.

‘व्हॉइस ऑफ खुरासान’ मासिकात नरेंद्र मोदीना विशेष लक्ष्य करण्यात आले

पंतप्रधान मोदी ‘इस्लामचे शत्रू’ !

या लेखात हिंदूंच्या नेत्यांचे, विशेषत: भाजपशी संबंधित असलेल्यांचे ‘मुसलमानांवर अत्याचार करणारे’ अशा प्रकारे वर्णन केले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष लक्ष्य करण्यात आले आहे. त्यांचे वर्णन ‘इस्लामचे शत्रू’ असे करण्यात आले आहे. ‘नरेंद्र मोदी इस्लामी मार्गांची खिल्ली उडवतात’, असेही लेखात म्हटले आहे. तसेच मोदी यांच्या राजवटीचे वर्णन ‘अतिरेकी हिंदु राष्ट्रवादीचे शासन’ असे करण्यात आले आहे. त्यांच्या धोरणांवर टीकाही करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचाराच्या वेळी भारतीय मुसलमानांना ‘घुसखोर’ म्हटले होते, असा आरोपही यात करण्यात आला आहे.

श्रीराममंदिरावर आक्रमण करण्याचा कट !

बाबरीच्या जागी श्रीराममंदिर बांधण्यासारख्या गोष्टीही या मासिकात सांगण्यात आल्या आहेत. या लेखातून लक्षात येते की, इस्लामिक स्टेट श्रीराममंदिरावर आक्रमण करण्याचा कट आखत होता. यात श्रीरामजन्मभूमीवर होणारे सर्व कार्यक्रम आणि भजन यांना ‘अश्‍लील’ आणि ‘घाणेरडे’ म्हटले आहे. मंदिराच्या आवारात दारू वाटण्यात आल्यासारख्या गोष्टी लिहिल्या आहेत. ‘मशिदीच्या पवित्र भूमीवर आता गायी आणि मूर्तींची पूजा केली जात आहे’, असेही पुढे म्हटले आहे.

माधवी लता आणि नूपुर शर्मा यांच्यावरही टीका !

लोकसभा निवडणुकीत भाग्यनगरमध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यावरही या लेखात टीका करण्यात आली आहे. तसेच भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. या लेखात माधवी लता यांना उमेदवारी देण्यामागचे कारण म्हणजे मुसलमानविरोधी नेत्यांना प्राधान्य देण्याचा भाजपचा हेतू असल्याचे मानले गेले आहे.

भारतातील २२ कोटी मुसलमानांना हिंदूंच्या गुलामगिरीत रहावे लागत असल्याचा दावा !

भारत आणि आजूबाजूचा परिसर मुसलमानविरोधी असल्याचे संबोधून इस्लामिक स्टेटने हिंदूंना मुसलमानांचे शत्रू म्हटले आहे. पुढे म्हटले आहे की, आज भारतातील अनुमाने २२ कोटी मुसलमानांना हिंदूंच्या गुलामगिरीत वेदनादायक जीवन जगण्यास भाग पाडले जात आहे. (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • भारताचे इस्लामी राष्ट्र करण्याचे धर्मांध मुसलमानांचे जुनेच स्वप्न आहे. हे स्वप्न धुळीस मिळवण्यास धर्मांधांचा योग्य बंदोबस्त करण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे, हे हिंदूंना कधी कळणार ?
  • हिंदु सत्तेवर बसले, तरी हिंदु धर्मासाठी आणि हिंदूंच्या रक्षणासाठी काहीच लाभ होत नाही, हेही हिंदूंना दिसत आहे. हे हिंदूंसाठी लज्जास्पद आहे !