Telangana Medak Violence : मेडक (तेलंगाणा) : गोतस्करीला विरोध केल्याने मुसलमानांकडून हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण !

(म्हणे) ‘हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार करण्याऐवजी गोतस्करी रोखल्याने हाणामारी !’ – पोलीस

मेडक (तेलंगाणा) – येथे गायींची तस्करी करणार्‍या मुसलमानांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमोच्या) कार्यकर्त्यांनी विरोध केला. या वेळी त्यांनी वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण केले. या वेळी हिंदूंनीही त्यांना चोप दिला. हिंसाचारात कैफ आणि आरिफ असे २ जण घायाळ झाल्याचे समजते. १५ जून या दिवशी घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मेडकचे पोलीस अधीक्षक बी. बाळा स्वामी यांना ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पोलिसांनी जमावबंदीचे कलम १४४ लागू केले असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे. काही लोकांना कह्यात घेण्यात आले आहे. भाजयुमोच्या नेत्यांनी तक्रार करण्याऐवजी वाहतूक थांबवली. त्यामुळे हाणामारी झाली. घायाळांवर उपचार चालू असलेल्या रुग्णालयावरही आक्रमण करण्यात आले. (थेट रुग्णालयावरही आक्रमण करण्याचे धर्मांध मुसलमानांचे धाडस होते आणि एकही निधर्मीवादी राजकीय पक्ष यावर तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार असल्यावर याहून वेगळे काय घडणार ? काँग्रेस सरकार म्हणजे पाकिस्तानी राजवट हे हिंदूंना कधी लक्षात येणार ?
  • सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही स्वत: गोतस्करी रोखायची नाही आणि ती रोखणार्‍या हिंदूंवरच हिंसाचाराचा आळ घ्यायचा, या वृत्तीचे हिंदुद्वेष्टे पोलीस !
  • हिंदू त्यांच्यावरील अशा प्रकारचे आघात निमूटपणे सहन करूनही, अथवा सतर्क राहून विरोध करूनही त्यांना ‘असहिष्णु’ आणि ‘हिंसाचारी’ म्हणत हिणवले जाते. त्यामुळे आता हिंदूंनीही ‘देशात कुणीही गोतस्करी करू धजावणार नाही’, अशी स्वतःची पत निर्माण केली पाहिजे, जेणेकरून हिंदूंच्या धार्मिक भावना जपल्या जातील !

मेडक येथे जाण्यापूर्वीच आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी घेतले कह्यात !

भाग्यनगर येथील गोशामहल मतदार संघाचे भाजपचे आमदार आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी विमानतळावर कह्यात घेतले. त्यांना सध्या त्यांच्या घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मुंबईवरून ते येथे पोचले होते.

येथून ते थेट मेडक येथे जाण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. आमदार टी राजा सिंह यांना रोखण्यासाठी सायबराबाद दंगल नियंत्रण पोलीस आणि स्थानिक पोलीस यांच्या अनेक तुकड्या सकाळपासून राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात करण्यात आल्या होत्या. ‘मेडक येथे जमावबंदी लागू असल्यामुळे टी. राजा सिंह यांना तेथे जाऊ देण्यात आले नाही’, असे सांगण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठ आमदारांची मुस्कटदाबी केली जात आहे तेथे सामान्य हिंदूंचे रक्षण कोण करणार ?