Pakistani Terrorist Death Row : फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या पाकिस्तानी जिहादी आतंकवाद्याचा दयेचा अर्ज भारताच्या राष्ट्रपतींनी फेटाळला !

नवी देहली – येथील लाल किल्ल्याच्या ठिकाणी तैनात असणार्‍या सुरक्षादलांवर २२ डिसेंबर २००० या दिवशी जिहादी आतंकवाद्यांनी गोळीबार केला होता. यात ३ सैनिकांना वीरगती मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी पाकिस्तानी नागरिक असलेला  लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी महंमद आरिफ उपाख्य अशफाक याला अटक केली होती. आरिफ हा इतर आतंकवाद्यांसमवेत कट रचल्याच्या प्रकरणी दोषी आढळला होता.

न्यायालयाने त्याला ऑक्टोबर २००५ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतरच्या अपिलांमध्ये देहली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांनी हा निर्णय कायम ठेवला होता. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आतंकवादी आरिफ याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. तो राष्ट्रपतींनी फेटाळला.

संपादकीय भूमिका 

राष्ट्रपतींचा अभिनंदनीय निर्णय ! अशांना कुणीच कोणतीही दया दाखवण्याची आवश्यकता नाही !