भगवंत हवासा वाटणे, यामध्ये सर्व मर्म आहे. समाधान न मिळायला खरे कारण कोणते असेल, तर ‘आम्हाला अजून भगवंताची नड (आवश्यकता) आहे’, असे वाटत नाही. भगवंताचे प्रेम यायला एकंदर ३ मार्ग आहेत.
अ. पहिला मार्ग, म्हणजे संतांची संगती करणे
आ. दुसरा मार्ग, म्हणजे सद्विचारांची जोपासना करणे
इ. तिसरा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण करणे.
यांपैकी ज्याला जो जुळेल तो त्याने करावा.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)