एका बाईने विचारले, ‘महाराज, मी पुष्कळ उपासना करते; पण परमार्थात आपली प्रगती किती झाली, हे कसे ओळखायचे ?’ त्यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘दुधाच्या सायीत जेवढा आपला जीव अडकतो, तेवढा भगवंतामध्ये अडकायला लागला की, परमार्थात बरीच प्रगती झाली आहे समजावे.’
(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)