केजरीवाल यांच्या अटकेवरून भारताला सल्ला दिल्याने भेदभाव करत असल्यावरून होत असलेल्या टीकेवर अमेरिकेचे विधान
वॉशिंग्टन (अमेरिका) – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केल्यानंतर अमेरिकेने त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. यावरून ‘पाकिस्तानात विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करून कारागृहात टाकण्यात आल्याच्या घटनेवर अमेरिका तोंड उघडत नाही’, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. यावर अमेरिकेने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले की, दोन्ही देशांबद्दलच्या आमच्या दृष्टीकोनात कोणताही भेद नाही. ‘पाकिस्तानातील प्रत्येकाला कायद्यानुसार वागणूक मिळावी’, असे आम्हाला वाटते.
When asked about US dept's strong position on Kerjiwal but not on Pakistani prisoners, US says,'would not agree with that characterization.. we want to see everyone in Pakistan treated consistent with the rule of law' pic.twitter.com/2nXupvM0O2
— Sidhant Sibal (@sidhant) April 4, 2024
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अनेक मासांपासून कारागृहात आहेत. त्यांच्याबाबत अमेरिका मौन बाळगून आहे. इम्रान खान यांनी पंतप्रधान असतांना अमेरिकेकडे दुर्लक्ष करत रशियाकडून साहाय्य मिळवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळेच अमेरिकेने त्यांचे सरकार पाडले, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. यामुळेच अमेरिका खान यांच्या अटकेकडे दुर्लक्ष करत आहे, असेच म्हटले जात आहे.
संपादकीय भूमिकागेल्या वर्षभरात अमेरिकेला असे बोलायला का सुचले नाही ? यावरूनच अमेरिकेचा दुटप्पीपणा आणि ढोंगीपणा उघड होतो ! |