मिरकरवाडा बंदर प्राधिकरण क्षेत्रातील ३१९ अनधिकृत बांधकामे हटवण्यात येणार

संबंधित बांधकामधारकांना प्रशासनाची नोटीस

रत्नागिरी (जि.मा.का.) – जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदर हे महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीचे असून या शासकीय भूमीत कोणतेही बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. असे असूनही या भूमीत अनुमाने ३१९ अनधिकृत बांधकामे अस्तित्वात आहेत. ही अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मत्स्यव्यवसाय विकास अधिकार्‍यांकडून अनेक वेळा संबंधितांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. आता पुन्हा १६ जानेवारी या दिवशी संबंधितांना पुढील ७ दिवसांत अनधिकृत बांधकाम हटण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली १३ जानेवारीला झालेल्या बैठकीमध्ये मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या भूमीवर असलेली अनधिकृत बांधकामे पोलीस विभागाचे संरक्षण घेऊन प्रशासनाने हटवावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार या अनधिकृत बांधकामधारकांनी दिलेल्या कालावधीत अनधिकृत बांधकामे हटवली नाहीत, तर ती प्रशासनाकडून हटवण्यात येऊन त्यासाठीचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.