डॉनल्ड ट्रम्प यांनी चित्रपट अभिनेते जॉन व्होइट, मेल गिब्सन आणि सिल्वेस्टर स्टॅलोन यांची हॉलीवूडसाठी ‘विशेष राजदूत’ म्हणून केली नियुक्ती !

मेल गिब्सन, जॉन वोइट आणि सिल्वेस्टर स्टॅलोन

वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी नुकतेच चित्रपट अभिनेते जॉन व्होइट, मेल गिब्सन आणि सिल्वेस्टर स्टॅलोन यांची हॉलीवूडसाठी त्यांचे ‘विशेष राजदूत’ म्हणून नियुक्ती केली. ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या ‘पोस्ट’मध्ये ही माहिती दिली. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हॉलीवूड कठीण काळातून जात आहे आणि हे तिघे त्याचा सुवर्णकाळ परत आणतील.

१. ‘जॉन व्होइट, मेल गिब्सन आणि सिल्वेस्टर स्टॅलोन हे तिघेही पुष्कळ प्रतिभावान आहेत आणि ते माझे डोळे अन् कान असतील. त्यांनी दिलेल्या कोणत्याही सूचना कार्यवाहीत आणल्या जातील.’, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

२. या महिन्याच्या प्रारंभी ट्रम्प यांनी त्यांच्या ‘व्हाईट हाऊस टीम’मध्ये काही महत्त्वाच्या नियुक्त्यांची घोषणा केली होती. त्यामध्ये राष्ट्रपतींचे साहाय्यक आणि विशेष अभियोक्ता म्हणून स्टॅनली ई वुडवर्ड, राष्ट्रपतींचे धोरण सल्लागार म्हणून रॉबर्ट ग्रॅबिएल ज्युनियर आणि धोरणात्मक कर्मचारी म्हणून निकोलस एफ् लुना यांचा समावेश आहे.

३. डॉनल्ड ट्रम्प २० जानेवारी या दिवशी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील.