दानिश आणि शहजाद यांना अटक
एर्नाकुलम् (केरळ) – राजस्थानमधील अजमेर येथे लपलेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी गेलेल्या केरळ पोलिसांवर त्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली. पोलिसांनी दानिश आणि शहजाद यांना अटक केली आहे. हे दोघेही मूळचे उत्तराखंडच्या रुडकी येथील आहेत. त्यांच्याकडून २ पिस्तूल आणि ७ जिवंत काडतुसे, तसेच काही रोख रक्कमही जप्त करण्यात आली. या दोघांना केरळ येथे झालेल्या ४५ लाख रुपयांच्या चोरीच्या प्रकरणी अटक करण्यासाठी केरळ पोलीस येथे आले होते.
केरळ पोलिसांनी अजमेर पोलिसांनी साहाय्य केले होते. हे पथक दानिश आणि शहजाद यांना पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी पोलिसांनर गोळीबार केला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी एकाने स्क्रू ड्रायव्हरद्वारे पोलिसांवर आक्रमण करण्याचाही प्रयत्न केला. यात पोलीस अधिकारी घायाळ झाला; मात्र पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
संपादकीय भूमिका
|