झारखंडच्या काही जिल्ह्यांत धर्मांधांकडून प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मिरवणुकांवर आक्रमण !

गिरिडीह (झारखंड) – झारखंडमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये धर्मांध मुसलमानांकडून श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी हिंदूंच्या मिरवणुकांवर आक्रमण करण्याच्या घटना घडल्या आहेत.

१. गिरिडीह येथे ३ ठिकाणी आक्रमणाच्या घटना घडल्या. गिरिडीह शहरातील लाईन मशिदीजवळ पहिली घटना घडली, तर दुसरी घटना पूर्णानगरात घडली. पूर्णानगरातील श्रीराममंदिराजवळ हिंदूंकडून मिरवणूक काढली जात असतांना धर्मांध मुसलमानांकडून त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. येथे धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर हिंदूंकडूनही प्रत्युत्तरादाखल दगडफेक करण्यात आली. यात काही जण घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी महंमद जाबीर याला अटक केली आहे. आझादनगर येथे झालेल्या घटनेत संघ स्वयंसेवक रोहित महतो हा तरुण गंभीररित्या घायाळ झाला.

२. लोहरदगा येथील हनहट गावात २२ जानेवारीला मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यात येत होता. या वेळी मंदिरावरील भोंग्यावर लावण्यात आलेल्या गाण्यामुळे धर्मांध मुसलमानांनी लाठी-काठी घेत मंदिरला घेराव घातला. याची माहिती पोलिसांना मिळताच मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात आले. येथे दोन्ही धर्मियांमध्ये चर्चा करून स्थिती सामान्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

३. धनबाद येथील कदैया गावात २१ जानेवारीला, तर छाताबाद येथे २२ जानेवारीला मिरवणुकांच्या वेळी धर्मांधांसमवेत वाद होऊन हाणामारी झाली. यात काही जण घायाळ झाले. पोलिसांनी दोन्ही जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

संपादकीय भूमिका 

श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिर उभे राहिले असले, तरी देशात अद्याप बाबराचे वंशज अद्यापही शेष असल्याने जोपर्यंत सरकार त्यांचा बंदोबस्त केला जात नाही, तोपर्यंत देशात खर्‍या अर्थाने रामराज्यासारखी स्थिती येणार नाही. त्यामुळे हिंदूंनी यासाठी कटीबद्ध होण्याची आवश्यकता आहे.