जानेवारी २०२४ मध्ये अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल, तेव्हा होणार्‍या सूक्ष्मातील प्रक्रियेचे एका संतांनी केलेले परीक्षण

१. एक संत आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेले ‘सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील स्पंदनांचे प्रमाण’

प्रस्तावित श्रीराममंदिर

सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण निराळे येण्याचे कारण

सूक्ष्म ज्ञानाविषयीच्या चित्रातील अधोरेखित स्पंदनांचे प्रमाण हे साधकाची पातळी, काळ आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता इत्यादी घटकांवर अवलंबून असते.

टीप १ : मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर सगुण चैतन्य मूर्तीरूपात प्रत्यक्षात तेथे राहील.

१ अ. श्रीरामतत्त्व

१ अ १. श्रीरामतत्त्व मंदिरात अखंडपणे आकृष्ट होणे

१ अ २. श्रीरामतत्त्वाचे कवच मंदिराभोवती असणे : श्रीरामतत्त्व मंदिरात अखंडपणे आकृष्ट होत राहून असे होईल.

१ अ ३. श्रीरामतत्त्वाचे वलय निर्माण होऊन ते व्यापक स्वरूपात मंदिर परिसरातील वातावरणात प्रक्षेपित होणे : श्रीरामतत्त्व मंदिराच्या खाली कार्यरत होतेच; परंतु विशिष्ट  लोकांमधील त्रासदायक शक्तीमुळे अनेक वर्षे ते (श्रीरामतत्त्व) अवरोधित होते. असे असले, तरी श्रीरामतत्त्व अजूनही तेथे टिकून आहे.

श्रीरामाची ही जन्मभूमी असल्याने श्रीरामाचे तत्त्व येथे मूलतःच आहे. त्यामुळे कित्येक वर्षांपासून या ठिकाणी श्रीरामतत्त्व कार्यरत आहे. जेव्हा श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, तसेच येथे अविरतपणे मंत्रपठण चालू असेल, तेव्हा श्रीरामतत्त्व जागृत होऊन ते अधिक प्रमाणात कार्यरत होईल. अधिक प्रमाणात कार्यरत झालेले श्रीरामतत्त्व सर्वत्र प्रवाहित होईल.

१ अ ४. श्रीरामतत्त्वाचे कण कारंज्याप्रमाणे वातावरणात प्रक्षेपित होणे : या स्थानावर श्रीरामाची कृपादृष्टी असल्याने असे आहे.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१ आ. चैतन्य

३ आ १. चैतन्याचे वलय श्रीराममंदिरात कार्यरत होणे : मंदिरात श्रीरामाचे तत्त्व कार्यरत होणार असल्याने असे होईल. श्रीरामाचे मंदिर होण्यासाठी लढणार्‍या लोकांची तळमळ आणि भाव यांमुळे असे आहे, तसेच मंदिर बांधण्याच्या कार्यात सहभागी असलेल्या लोकांमध्येही भाव आहे.

१ आ २. चैतन्याचे वलय वातावरणात व्यापक स्वरूपात प्रक्षेपित होणे : हिंदु धर्माविषयी लोकांमध्ये जागृती करून हिंदु धर्माचा प्रसार करण्यासाठी, तसेच हिंदूंमध्ये धर्माचरणाचे महत्त्व आणि संघटितपणा निर्माण होण्यासाठी असे होईल.

१ इ. शक्ती

१ इ १. शक्तीचे कण श्रीराममंदिरात कार्यरत होऊन ते वातावरणात प्रक्षेपित होणे : मंदिराचे, तसेच मंदिर उभारणीसाठी कार्यरत असणार्‍या आणि धर्मकार्य करणार्‍या लोकांचे संरक्षण होण्यासाठी असे होईल.

१ ई. धर्मशक्ती

१ ई १. धर्मशक्तीचे कण चक्राकार स्वरूपात कार्यरत होऊन ते वातावरणात प्रक्षेपित होणे : हिंदु संस्कृतीनुसार लोकांनी आचरण करावे, तसेच लोकांची हिंदु धर्म आणि देवता यांच्यावरील श्रद्धा वाढावी, यांसाठी असे होईल.

२. इतर सूत्रे

अ. जेव्हा रामभक्त मंदिरात येऊन श्रीरामाला प्रार्थना करतील, तेव्हा अल्प भाव असलेल्यांना ०.५ टक्के, तर अधिक भाव असलेल्या रामभक्तांना १.१५ टक्के श्रीरामतत्त्व मिळेल.

आ. श्रीरामाचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होऊन मंदिरात श्रीरामाचे अस्तित्व रहाण्यासाठी श्रीराममंदिरातील पुरोहितांनी ३ ते ५ वर्षे धार्मिक विधी आणि मंत्रपठण करणे आवश्यक आहे.

३. सूक्ष्म परीक्षण करतांना ईश्वराकडून मिळालेले ज्ञान

अ. हिंदूंची भगवंतावर असलेली श्रद्धा, क्षात्रभाव आणि धर्मावरील निष्ठा यांमुळे देवता युद्धात हिंदूंना साहाय्य आणि मार्गदर्शन करतील. त्यामुळे हिंदूंचाच विजय होईल.

– एक संत (१७.६.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.