इस्रायल-हमास युद्धावरून गोव्यात अल्पसंख्यांक संघटनांचा पणजी येथे निषेध कार्यक्रम
पणजी, १० नोव्हेंबर (वार्ता.) : इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये मुसलमानांचा नरसंहार करत आहे. या ठिकाणी लहान मुले आणि महिला यांच्यावर बाँब टाकले जात आहेत. हे माणुसकीच्या विरोधात आहे. याचा आम्ही निषेध करतो. भारत सरकारने इस्रायलची बाजू घेऊ नये. जगात शांतता राखावी, अशी मागणी विविध मुसलमान संघटनांनी आझाद मैदानात आयोजित केलेल्या एका निषेध कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांचाही सहभाग होता. (एका इस्रायली महिला सैनिकाला विवस्त्र करून गाझा पट्टीत तिची धिंड काढली, तेव्हा पॅलेस्टाईनमधील अल्पवयीन युवकही त्याचा आनंद लुटत होते. ही मानवता आहे का ? हमास ही आतंकवादी संघटना गाझा पट्टीतील मुसलमान नागरिकांची ढाल बनवून इस्रायलवर क्षेपणास्त्रे फेकत होती. त्यामुळे इस्रायलने गाझा पट्टीत आक्रमण करून हमासच्या आतंकवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्यात काही नागरिक मेले; परंतु त्यापूर्वी त्यांना गाझा पट्टी सोडून जाण्यासाठी वेळ देण्यात आली होती. युद्ध चालू आहे, तर ते नागरिक गाझा पट्टी का सोडून गेले नाहीत ? – संपादक)
(सौजन्य : In Goa 24×7)
आयोजकांच्या मते त्यांना पोलिसांनी निषेध मोर्चा काढण्यासाठी अनुमती दिली नाही; मात्र बॅनरविना लहान स्वरूपात निषेध कार्यक्रम घेण्यास सांगितले, असे आयोजकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या वेळी एकाही व्यक्त्याने इस्रायलवर हमास या आंतकवादी संघटनेने केलेल्या आक्रमणाचा आणि इस्रायली नागरिकांचा विशेषत: ४० मुलांना अत्यंत क्रूरतने केलेल्या हत्येचा, तसेच हमासने ओलीस ठेवलेल्या शेकडो नागरिकांविषयी एकही शब्द काढला नाही. (अल्पसंख्यांक क्रूर आक्रमण करतात त्या वेळी गप्प बसणारे आणि त्यांना धडा शिकवल्यावर अत्याचार झाल्याचे अश्रू ढाळणारे मुसलमान धर्मांधच ! भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या विरोधात मोर्चा काढणार्यांना कारागृहातच टाकायला हवे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाहमासने इस्रायलमध्ये घुसून तेथील मुलांचे गळे कापले, महिलांवर बलात्कार केले, एका इस्रायली महिला सैनिकाला विवस्त्र करून गाझा पट्टीत तिची धिंड काढली, तेव्हा गोव्यातील अल्पसंख्यांक गट झोपला होता का ? |