Diwali resolution in US House :अमेरिकेच्या संसदेत मांडला दिवाळीचे महत्त्व सांगणारा ठराव

अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती

वॉशिंग्टन – दिवाळीचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेेखित करणारा ठराव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला. कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, अमेरिकेतील ३० लाखांहून अधिक हिंदू, शीख आणि जैन लोक दिवाळीचा पवित्र सण साजरा करतात.

वाईटावर चांगल्याने विजय मिळवल्याचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. कृष्णमूर्ती यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला, ज्यामध्ये ते म्हणाले, ‘‘दिवाळीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व यांची सर्वांना ओळख करून देण्याच्या उद्देशाने मी माझ्या सहकार्‍यांसोबत हा द्विपक्षीय ठराव मांडला आहे.’’